भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गाडी लावली. नाशिकफाटा (भोसरी) ते शिवाजीनगर असा मेट्रोचा प्रवास केला व रिक्षाने स्वारगेट येथे पोहचलो. आमचा प्रत्येक ट्रेकला बस इथूनच निघते मी मात्र नाशिकफाटा येथून जॉईन करतो. पण या वेळी आमचे मित्र प्रदिप मदने काही कारणास्तव या ट्रेकला येणार न्हवते. त्यामुळे मी आज स्वारगेटला आलो होतो. बस घेऊन ड्राइवर काका देखील वेळेत आले. तेथून येणाऱ्या सदस्यांना घेऊन १०:३० वाजता गाडी सोडली. पुढे नाशिक फाटा येथे काही सदस्य व काही मोशी येथून घेतले. पुढे नारायणगांव येथे चहा साठी थांबून पुढे जुन्नर, गणेशखिंड, माळशेज घाट मार्गे जेथून ट्रेकला सुरवात होते अशा "हॉटेल भैरवनाथ / मनूचा ढाबा" येथे रात्री ०३:३० वाजता येऊन पोहचलो. 

प्रथम मी सह्याद्री मित्र भास्कर मेंगाळे याची भेट घेतली, त्यांची नाष्ट्याची तयारी चालू झाली होती. तेथे मुंबई वरून अजित व शैलेश दादा मुंबईचे सदस्य घेऊन आले होते. ते ०२:०० वाजता पोहचले होते त्यांना झोप लागणार इतक्यात मी जाऊन उठवले. त्या नंतर सर्व सदस्यांना आवरून घ्यायला सांगितले.

पहाटे ०४:०० वाजता सर्वांचा परिचय व सूचना सत्र घेऊन प्रत्येक सदस्याला एक हार्नेस दिला व ट्रेकला सुरवात केली. आमचा सोबतीला रवी पारधी (बाळू दादा) वाटाड्या म्हणून आला, सर्वजण अंधारामध्ये विजेरीचा प्रकाशामध्ये चालायला सुरवात केली. पूर्ण घनदाट जंगलाची वाट पण आता सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे वाट पूर्णपणे मळलेली आहे. तरी वाटेत एका विंचुने वाट अडवलीच त्याला बाजूला करून पुढे निघालो. मार्गा वरती सर्वात पुढे वाटाड्या, मी व काही सदस्य तर मध्ये शैलेश दादा व त्यामागे अजित व शेवटी राहुल रासकर दादा अश्या नियोजनाप्रमाणे मध्ये मध्ये एकमेकांना हाक देत पहाटे ०५:३० वाजता माची / पठारावरती वरती येऊन पोहचलो. 

सकाळी परिचय सत्र घेतांना
सकाळी परिचय सत्र घेतांना 

वाटेवरती दिसलेला विंचू
वाटेवरती दिसलेला विंचू

अंधार असल्यामुळे किती वरती चालून आलो हे देखील समजले नाही व समोर असलेला भैरवगड देखील दिसत नव्हता. माचीवरती थोडी विश्रांती घेतली व पुढे निघालो. पुढे पठारावरील (माचीवरील) सरळ वाट व समोर असलेली निसरडी वाट संपून तासभरा मध्ये गडाचा कातळ भिंतीच्या इथे येऊन पोहचलो. आता मात्र थोडे दिसू लागले मग गडाचा कातळ कडा उजव्या बाजूला ठेऊन समोर चालू लागलो व गडाला थोडासा वळसा मारून समोर असलेला एक लहान दगडी पॅच चढून वरती आलो. तसे समोर गडाचा कातळा मध्ये एक आयात कृती गुहा खोदलेली पाहायला मिळाली. गुहे पासून थोडे पुढे खालील दिशेने आलो व खिंडी मध्ये येऊन पोहचलो.

गुहा - भैरवगड (मोरोशी)
गुहा - भैरवगड (मोरोशी)

खिंडीतून दिसणाऱ्या भैरवगडाचा पायऱ्या
खिंडीतून दिसणाऱ्या भैरवगडाचा पायऱ्या 

या खिंडी मधून आता आम्हाला समोर दिसत असलेल्या भैरवगडाचा कातळावरील प्रसिद्ध असलेल्या धडकी भरवणाऱ्या थरारक, अवघड व तुटलेल्या पायऱ्यांचा साहाय्याने गड सर करायचा होता. आमचा पुढे वाटाड्या रवि भाला आला होता त्याने पूर्ण मार्गावरती दोरी लावून ठेवली होती. त्या खिंडी मध्ये सर्व सदस्यांनी हार्नेस चढवले व एक एक करून आरोहण करायला सुरवात केली (गड चढायला घेतला).

सुरवातीला काही सोप्या पायऱ्या लागल्या त्या चढून वरती आलो त्याच्या पुढे पायऱ्या तुटलेल्या आहेत तेथून पुढे जाण्यासाठी तेथे असलेल्या गुहेला एका लहान छिद्र (hole) आहे तेथून थोडे रांगून गुहे मध्ये आलो. या गुहे मध्ये वरती चढण्यासाठी लाकडे लावलेली आहेत तेथून वरती चढून गुहेमधून पुन्हा पायऱ्यांन वरती यावे लागते. मी तेथे थोडे थांबलो, पुढे सर्व सदस्य गेले व मागून अजित माझासाठी हार्नेस घेऊन आला व आम्ही पुढे निघालो. मोजक्याच पायऱ्या चढल्या नंतर पुढे पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत तेथे वाटाड्या दादाचा मदतीने आम्ही वरती आलो. पुढे गडा वरती जातांना एका बाजूला खोल दरी व समोर‌ असलेल्या कातळावरील पायऱ्या एक एक सावधगिरीने चढू लागलो. पुढे वाटेमध्ये कातळामध्ये बनवलेले एक कोरडे पाण्याची टाके लागले. त्यापुढे काही पायऱ्या व त्यानंतर पुन्हा एक पाण्याची टाके लागले पण त्यामध्ये पाणी खराब होते.  त्यापुढे आणखीन काही पायऱ्या व एक अवघड पॅच पार करून माथ्यावरती येऊन पोहचलो. तेथे एक लहान खोलीचे अवशेष पाहायला मिळाले. पुढे उजव्या बाजूला दोन जोड बुजलेले पाण्याचे टाके पाहिले व माघारी येऊन डाव्या बाजूने चालत गडाचा सर्वोच्च ठिकाणी येऊन पोहचलो.

पायऱ्यांच्या वाटेवरील गुहेतील फोटो
पायऱ्यांच्या वाटेवरील गुहेतील फोटो

भैरव गडाच्या कातळातील पायऱ्या
भैरव गडाच्या कातळातील पायऱ्या
भैरव गडाच्या पायऱ्यांच्या वाटेवरील कोरडे टाके
भैरव गडाच्या पायऱ्यांच्या वाटेवरील कोरडे टाके

भैरवडाच्या कातळातील पायऱ्या
भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच
भैरवगडाचा पायऱ्यांच्या वाटेवरील पाण्याचे टाके

भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच
भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच

दोन एकत्र असलेली व बुजलेली पाण्याची टाकी
दोन एकत्र असलेली व बुजलेली पाण्याची टाकी - भैरवगड (मोरोशी)

मोरोशी भैरव गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर तेथुन सह्यमंडळ पाहायचा आनंदच वेगळा. तेथून डाव्या बाजूला नवरा नवरी सुळका, नाणेघाटाचा परिसर व उजव्या बाजूला अलंग - मदन - कुलंग (AMK), कळसुबाई शिखर,आजोबा शिखर, कात्राबाई शिखर, गवळदेव शिखर, घनचक्कर शिखर, शिरपुंजे भैरवगड व भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्र गड - कोकणकडा, तारामती शिखर, हरिश्चंद्र गडाचा बालेकिल्ला असे सर्व संपूर्ण सह्य मंडळ पाहून घेतले. सह्याद्री फिरताना एका किल्ल्या वरून दिसणारे आपण पाहिलेले इतर किल्ले पाहणे म्हणजे सह्याद्री भटकंती मधील एक मन सुखद अनुभव, गडावरती येताच नानांचा अंगठा दिसला मला माझा जुन्या आठवणी जाग्या झाल्या २०२० मध्ये मी इथून सूर्यास्त पाहिला होता. तर मागील काही महिन्या मध्ये मी AMK व भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा रेंज ट्रेक केला होता ते सर्व किल्ले/शिखर इथून पाहतांना मन सुखावून गेले.

भैरव गडाच्या माथ्यावरील फोटो
भैरव गडाच्या माथ्यावरून दिसणारे नवरा नवरी सुळका, नानाचा अंगठा व नाणेघाटाचा परिसर
भैरव गडाच्या माथ्यावरून दिसणारे नवरा नवरी सुळका, नानाचा अंगठा व नाणेघाटाचा परिसर

भैरवगडचा‌ माथ्यावरती पोहचल्यानंतर थोडे बसून विश्रांती घेतली व सोबत आणलेला खाऊ खाऊन गड उतरायला सुरवात केली. जितक्या सावध गतीने गड चढून आलो होतो तितक्याच सावधानतेने गड उतरायला घेतला. गडावररती येणाऱ्यांची संख्या वाढली होती त्यामुळे आम्ही काही पायऱ्या उतरून आल्या नंतर तेथूनच प्रस्थारोहण केले व खिंडी मध्ये आलो. तेथे भास्कर दादा देखील काही दुसरे सदस्य घेऊन आला होता, त्याचाशी थोडे बोलणे झाले व आम्ही खाली पुढे निघालो. गडाचा वळसा मारून पुढे आल्या नंतर डाव्या बाजूला वरील दिशेला असलेल्या खांब टाक्या मधील पाणीभरून घेतले. आता सकाळचे अकरा वाजले होते मात्र रखरखते ऊन लागत होते. पुढे आलेले सदस्य माचीवरील भैरवनाथाचे दर्शन घेऊन सावली मध्ये विसावले होते तितक्यात सर्वजण तेथे जमा झाले व समुह छायाचित्र घेऊन खाली निघालो. व दुपारी ०१:३० वाजे पर्यंत सर्वजण हॉटेल भैरवनाथ / मनूचा ढाबा येथे येऊन पोहचलो.

भैरवडाच्या खाली उतरतांना वरील  दिशेने दिसणाऱ्या पायऱ्या
भैरवडाच्या खाली उतरतांना वरील  दिशेने दिसणाऱ्या पायऱ्या

भैरव गडावरील कातळावरती असलेले पाण्याचे टाके

भैरवडाच्या माचीवरील भैरवनाथाचे मंदिर

भैरव गडाच्या माचीवरून घेतलेला फोटो व मागे भैरवगड
भैरव गडाच्या माचीवरून घेतलेला फोटो व मागे भैरवगड

भैरव गडाच्या माची वरती जाणारी वाट व मागे भैरवगड

भैरवगडचा हा ट्रेक करून झाल्यानंतर सर्वांना कडाक्याची भूक लागली होती त्यामुळे प्रथम भरपेट जेवण केले. त्यानंतर अजित व शैलेश दादा मुंबईकडे व आम्ही पुणे कडे माळशेज घाट, ओझर, नारायणगांव मार्गे आलो व सायंकाळी ०६:०० वाजता पुणे येथे येऊन पोहचलो.

एक दिवसीय भटकंतीमध्ये मोरोशीचा भैरवगड आरोहण, प्रस्तारोहण, गडावरून सह्यमंडळ पाहणे, सर्व मित्रांचा सहवास, सहभोजन, सह्याद्री जगण्याचा एक सुखद अनुभव आणि गोड आठवणी सोबत घेऊन घरी पोहोचलो.

सोबती : अजित गवेकर, शैलेश जाधव, राहुल रासकर व इतर सदस्य.

©सुशील राजगोळकर

#भैरवगड #मोरोशी #सह्याद्री ⛰️ #महाराष्ट्र 🚩#निसर्ग 🌳🌈 #भटकंती🏕️ #प्रवास🏍️ #ठाणे #मुंबई #ईगतपुरी #पुणे #सुशील_राजगोळकर #२४मार्च२०२४

अलंग - मदन - कुलंग | AMK - Alang Madan Kulang | १० व ११-फेब्रुवारी-२०२४

AMK म्हणजे अलंगगड - मदनगड - कुलंगगड सह्यांद्री मधील चढाईसाठी खूप अवघड मोठे म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ला पैकी एक. हे ०३ किल्ले एक मेकाला जोड आहेत त्यामुळे हे एकत्र पाहिले जातात. खूप दिवसांपासून बागलाण AMK ट्रेक करायची इच्छा होती. सहसा येथे एकट्याने कोणी ट्रेक करत नाहीत. त्यासाठी आरोहण प्रस्थारोहन साहित्य ते हाताळण्याचे कौशल पाहिजे. त्यामुळे मी हे किल्ले ट्रेकगुरु या ग्रुपचा नियोजना सोबत पाहायचे ठरवले.

त्या प्रमाणे शुक्रवार दिनांक ०९-फेब्रुवारी-२०२४ रोजी रात्री ११:३० वाजता पुणे येथून निघालो शनिवार १०-फेब्रुवारी-२०२४ रोजी पहाटे ०५:०० वाजता "आंबेवाडी" या गावी लक्ष्मण केकरे यांच्याकडे आलो. तेथे काही जण मुंबई वरून रात्रीच आले होते असे एकूण आम्ही १७ जण होतो. सर्वजण फ्रेश होऊन नाश्ता केला आणि पहिल्या दिवसाचे दुपारचे जेवण, तंबू ,आरोहण प्रस्थारोहन साहित्य सर्वांनी विभागून घेतले सोबत लक्ष्मण केकरे (वाटाड्या) यांना घेऊन सकाळी ०६:३० वाजता ट्रेकला सुरवात केली.

पुढे काही घनदाट जंगलाची सावलीतून जाणारी तितकीच दमवणारी चढाईची वाट पार करून आलो. वाटेमध्ये एका दगडावरती एक मूर्ती ०३ दिशेला दिशादर्शक बाण कोरलेला दगड पाहिला तेथून पुढे असलेली जंगलाची वाट संपून काही लहान कातळमधील पायऱ्या चढून आलो ०९:०० वाजता अलंग गडाचा पायऱ्यांच्या रॉक पॅच चा खाली/ आधी असलेल्या गुहेपाशी येऊन पोहचलो.

 


एक मूर्ती व ०३ दिशेला दिशादर्शक बाण कोरलेला दगड
मूर्ती  ०३ दिशेला दिशादर्शक बाण कोरलेला दगड


"मदनगड"

पहिला मदनगड पाहून अलंगगड वरती राहायला यायचे असे ठरवून आम्ही गुहेमध्ये वजनदार बॅग ठेऊन लहान बॅग मध्ये पाणी, काही खाऊ आणि आरोहण प्रस्थारोहन साहित्य सोबत घेतले, गुहेपासून पश्चिम दिशेला मदनगडाकडे निघालो. अलंग गडाचा खालून कपारींमधून असलेल्या वाटेने अलंग मदनगडाचा खिंडी मध्ये आलो येथून डाव्या बाजूला सरळ वाट कुलंग गडाकडे जाते आम्ही उजव्या बाजूला मदनगडाकडे चालून आलो. समोर असलेल्या कातळ खोदीव पायऱ्या चढून थोडे वरती आलो, त्यानंतर गडाला वळसा मारून पुढे जातांना असलेल्या अवघड ठिकाणी दोरीचा साहाय्याने समोर आलो. तेथे असलेल्या काही पायऱ्या चढून ४० फुटी कातळकडा (रॉक पॅच) जवळ आलो. एक एक जण सावधगिरीने आरोहण साहित्याचा लक्ष्मणचा (वाटाड्यां) मदतीने वरती आलो. तेथून पुढे पूर्व दिशेला (अलंग गडाचा दिशेला) असलेल्या डाव्या बाजूला दरी उजव्या बाजूला मदन गडाचा कडा अशा सरळ निमुळता वाटे वरून सावधगिरीने पुढे चालत आलो. तेथून पुढे काही तुटलेल्या लहान कातळ खोदीव पायऱ्या चढत असताना वाटेत असलेली एक लहान गुहा पाहिली तेथून मागे दिसत असलेल्या अलंग गडाचे विहंगम दिसणारे फोटो काढले समोर असलेल्या काही पायऱ्या चढून मदन गडाचा माथ्यावरती पोहचलो.


अलंगगड येथून जातांना दिसणारा मदनगड

अलंगगड येथून जातांना दिसणारा मदनगड


मदनगडचा कातळ खोदीव पायऱ्या

मदनगडचा कातळ खोदीव पायऱ्या 


मदनगडाचा ४० फुटी कातळकडा (रॉक पॅच)
मदनगडाचा ४० फुटी कातळकडा (रॉक पॅच)

मदनगडावरून दिसणारा अलंगगड

मदनगडावरून दिसणारा अलंगगड 


मदनगडचा कातळ खोदीव पायऱ्या

मदनगडचा कातळ खोदीव पायऱ्या 

मदनगडाचा माथ्यावरती समोर असलेल्या ०२ पाण्याचा टाक्या त्यापुढे असलेली गुहा पाहून गडाचा अचुत्य माथ्यावरती आलो. तेथून पश्चिमेला दिसत असलेला कुलंगगड, छोटा कुलंग पूर्वेला असलेला अलंगगड ईतर दिशेला असलेले रतनगड, आजोबागड, कात्राबाई डोंगर, डांग्या सुळका, हरिहर, त्र्यंबकगड पाहून तितक्याच सावधगिरीने गड उतार झालो अलंग गडाचा गुहेपाशी आलो गुहेमध्ये बसून दुपारचे जेवण उरकले अलंगगड चढाईला घेतला.

 

मदनगडा वरील पाण्याचे टाके
मदनगडावरील पाण्याचे टाके

मदनगडावरील गुहा
मदनगडावरील गुहा

मदनगडावरील गुहा
मदनगडावरील गुहा
मदनगडावरून दिसणारा कुलंगगड
मदनगडावरून दिसणारा कुलंगगड

"अलंगगड"

अलंगगडाचा गुहेजवळ दगडावरती असलेले देवीचे शिल्प पाहून अगदी समोरच असलेल्या काही तुटक्या पायऱ्या दोरीचा साहाय्याने काही कातळ खोदीव पायऱ्या चढून ६० फुटी कातळकडा (रॉक पॅच) जवळ आलो. हा कातळकडा आरोहण साहित्य वापरून एक एक जण चढू लागले. कातळकडा चढुन येता बाजूला एक लहान गुहा पाहिलीमदनगडावरून दिसणारा कुलंगगड रील गुहा पाण्याचे

बाकी सदस्य चढेपर्यंत बाजूला आणखीन एक ज्यादाचा दोर बांधून मी काही जण साहित्य वजनदार बॅग बांधून वरती ओढुन घेतल्या या लहान गुहे मध्ये ठेवल्या. पुढे लहान तुटलेल्या वळणाचा भीतीदायक पायऱ्या चढू लागलो काही पायऱ्यांना खोबण्या आहे त्याचा दोरीचा मदतीने आम्ही अलंग गडाचा माथ्यावरती ०४:३० वाजता पोहचलोसमोर गोलाकार बांधून घेतलेल्या अवशेषा मध्ये असलेल्या लहान शिवलिंग नंदी येथे आलो. तेथेच आम्ही सर्व प्रथम आमचे तंबू लावून घेतले त्यामध्ये बॅग ठेऊन गडमाथा भटकंतीला सुरवात केली


अलंग गडाचा वाटेवरील शिल्प
अलंग गडाचा वाटेवरील शिल्प


अलंग गडाचा तुटलेल्या पायऱ्या
अलंग गडाचा तुटलेल्या पायऱ्या



अलंग गडाचा रॉक पॅच नंतर वळणाचा असलेल्या पायऱ्या
अलंग गडाचा रॉक पॅच नंतर वळणाचा असलेल्या पायऱ्या

अलंग गडाचा माथा वरती पोहचल्या नंतर प्रथम नजरे समोर दिसणारा अलंगगड
अलंग गडाचा माथा वरती पोहचल्या नंतर प्रथम नजरे समोर दिसणारा अलंगगड

अलंग गडाचा अवशेष मध्ये असलेला नंदी व शिवलिंग
अलंग गडाचा अवशेष मध्ये असलेला नंदी व शिवलिंग

पुढे पूर्व दिशेला (शिवलिंग  नंदी समोर) दिसत असलेल्या गुहेचा वाड्याचा दिशेने आम्ही चालायला लागलो, समोर असलेली पाण्याची टाकी पाहून थोडे वरील दिशेला असलेल्या गुहे पाशी आलो. या मुख्य गुहे मध्ये समोर एक मोठी खोली त्या मागे आणखीन तीन लहान खोल्या पाहून  बाहेर आलो. बाजूला एक अर्थवट गुहेचे काम राहिलेले पाहून वरती चालत आलो. पुढे कपारीमध्ये झाडा झुडपांमध्ये लपलेली आणखीन एक गुहा पाहून समोर कातळा वरती असलेल्या काही पायऱ्या चढून मोठ्या प्रमाणात असलेल्या अवशेषा पाशी आलो. तेथील अवशेष पाहून पुढे असलेल्या ११ जोड पाण्याचा टाक्यापाशी आलो. एक सर्व टाक्या एकच कातळ खोदून बनवलेल्या पाहायला मिळाल्या खालील दिशेला दगडी बांध बांधून घेतलेला पाहिला. टाक्यांन पासून वरती दिसत असलेल्या वाड्याचा अवशेषां पाशी आलो. हा वाडा जरी आता पूर्ण अस्थीत्वात नाही तरी या वाड्याची भिंत मदन कुलंग गडावरून स्पष्ट दिसत होती. वाड्याचा बाजूला असलेल्या दोन मोठा पाण्याचा टाक्या पाहून पुढे असलेले उध्वस्त महादेव मंदिर आणि तेथे असलेला मराठी भाषे मध्ये उल्लेख असलेला शिलालेख पाहिला. तेथून बाजूला असलेले दोन लहान पाण्याची टाकी वीरांचा उध्वस्त समाधि पाहून थोडे वरील दिशेला असलेल्या दीपमाळ येथे आलो. तेथे कपारी मध्ये असलेले पाण्याची टाकी गुहा पाहून त्याचा बाजूने टेकडी वरती आलो. अलंगडावरून कळसुबाई, पट्टा, बितनगड, दक्षिणेला हरिश्चंद्रगड आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड खत्राबाईचा डोंगर तर उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड असा परिसर पहायला मिळाला. तेथुनच सह्यांद्री मधून दिसणारा तो विलोभनीय सूर्यास्थ पाहून गड माथावरून जेथे तंबू लावले होते तेथे आलो. आम्ही गड फिरून येई पर्यंत लक्ष्मणने (वाटाड्या) जेवण बनवायला घेतले होते. काही वेळात जेवण तयार झाले आणि सर्वांनी जेवणा वरती ताव दिला त्यानंतर रात्री शेकोटी भवती बसून गप्पा टप्पा मारून झोपी गेलो.  दुसऱ्या दिवशी पहाटे आवरला नंतर मी एकटा पश्चिम दिशेला जाऊन अलंगगडावरून दिसणारा मदनगड पाहून आलो. 

 

अलंग गडावरील गुहा
अलंग गडावरील गुहा
अलंग गडावरील ११ पाण्याचा टाक्या

अलंग गडावरील वाड्याचे अवशेष
अलंग गडावरील वाड्याचे अवशेष

अलंग गडावरील पाण्याची टाकी
अलंग गडावरील पाण्याची टाकी
अलंग गडावरील उध्वस्त शिवमंदिर व शिलालेख
अलंग गडावरील उध्वस्त शिवमंदिर व शिलालेख
अलंग गडावरील गुहेतील टाकी
अलंग गडावरील गुहेतील टाकी

अलंग गडावरील दीपमाळ
अलंग गडावरील दीपमाळ

अलंग गडावरून दिसणारा सूर्यास्त
अलंग गडावरून दिसणारा सूर्यास्त

अलंग गडावरून दिसणारा मदनगड

"कुलंगगड"

दुसरे दिवशी पहाटे ०५:०० वाजता उठून तंबू वगैरे सर्व आवरले, आणि मॅग्गी चहा असा भरगच नाश्ता करून अलंगगड उतरायला घेतला. अलंगगडाचा अवघड पायऱ्या कातळकडा प्रस्तरोहण करून खाली गुहेपाशी पोहचायला ०९:०० वाजले. तेथून लक्ष्मण घरी गेला आम्ही पुढे अलंगगडाचा बाजूने अलंग मदन गडाचा खिंडी मध्ये आलो. तेथून डाव्या बाजूला सरळ समोर असलेल्या मार्गाने पुढे चालू लागलो. उजव्या बाजूला मदन गडाचा कातळ कडा डाव्या बाजूला दरी असलेला मार्ग पार करून कुलंग मदन गडाचा खिंडी मध्ये आलो. तेथून पुढे डाव्या बाजूला कडा उजव्या बाजूला झाड झुडपांची दरी असा मार्ग चालत पुढे आलो. नंतर लक्षात आले मदन कुलंग गडाचा मध्ये ०२ लहान विभक्त डोंगर होते जे आम्हाला मदन गडावरून कुलंग गडाला जोडलेले वाटत होते. तेथून पुढे कुलंगगडाचा कातळ कडा डाव्या बाजूला झाडांचा सावलीमधील मार्ग पार करून कुलंग गडाचा पायरी मार्गाजवळ आलो.


मदन गडाजवळून दिसणारा कुलंगगड 


कुलंग गडाला सुरवाती पासूनच लहान मोठा अशा कातळ पायऱ्या असलेल्या चढून पहिल्या दरवाजापाशी पोहचलो. तेथे कातळामध्ये दोन गुहा पाहिल्या तो दरवाजा आत मधुन पाहिल्यास घुबड बसल्या सारखे वाटले. हा दरवाजा कुंलंग गडावरील घुबड फ्रेम म्हणून प्रसिद्ध आहे. तेथून पुढे असलेल्या कातळा मधील पायऱ्या चढून दरवाजा पाशी आलो तेथे एक लहान हनुमान कोरलेला पाहिला. दरवाजा मधून समोर गडमाथावरती आलो.


कुलंग गडाचा पायऱ्या
कुलंग गडाचा कातळ खोदीव पायऱ्या 

कुलंग गडाचा घुबड फ्रेम म्हणून प्रसिद्ध झालेला दरवाजा
कुलंग गडाचा घुबड फ्रेम म्हणून प्रसिद्ध झालेला दरवाजा

कुलंग गडाचा पायऱ्यांचा वाटेवरील गुहा
कुलंग गडाचा पायऱ्यांचा वाटेवरील गुहा

कुलंग गडाचा कातळ खोदीव पायऱ्या

गड माथावरती प्रवेश करता समोरच पूर्वेला / डाव्या बाजूला पाण्याचा टाक्या दिसत होत्या आम्ही प्रथम पश्चिम / उजव्या दिशेला आलो तेथे समोर असलेली गुहा गुहेवरील अवशेष पाहून समोर असलेल्या दोन वाड्यांचे अवशेष पाहिले. तेथून समोर दिसणारा छोटा कुलंगगड पाहून माघारी फिरलो. वाड्याचा अवशेषांचा खालील बाजूला असलेल्या दोन पाण्याचा टाक्या पाहून पुढे गडावरील १० एकत्र असलेल्या पाण्याचा टाक्या पाशी आलो. टाक्या जवळ एक लहान शिवलिंग पाहिले तेथून सरळ समोर माथ्या वरती आलो. तेथून पूर्व दिशेला "मदनगड अलंगगड" यांची भव्यता पाहिली. तसेच तेथून गडाचा खालील दिशेला असलेले दोन मोठे पाण्याचे टाके अवशेष पाहून दरवाजापाशी आलो. सावधगिरीने कुलंगडाचा पायऱ्या उतरून खाली आलो.


कुलंग गडावरती प्रवेश करता पूर्व दिशेला दिसणारा कुलंगगड

कुलंग गडावरील गुहा व त्यावरील अवशेष

कुलंग गडावरील गुहा
कुलंग गडावरील गुहा

कुलंग गडावरील वाड्याचे अवशेष
कुलंग गडावरील वाड्याचे अवशेष

कुलंग गडावरून दिसणारा छोटा कुलंग
कुलंग गडावरून दिसणारा छोटा कुलंग

कुलंग गडावरील पाण्याची टाकी
कुलंग गडावरील पाण्याची टाकी

कुलंग गडावरून दिसणारा मदनगड व अलंगगड
कुलंग गडावरून दिसणारा मदनगड व अलंगगड


कुलंग गडाची भटकंती नंतर आम्ही आंबेवाडी गावाकडे निघालो पुढे काही अंतरा वरती सपाटीला आलो तेथून दोन मळलेल्या पायवाट होत्या डाव्या बाजूला पुढे जाऊन पाहिले हि वाट दुरवरती जात होती खाली पूर्ण दरी होती त्यामुळे आम्ही माघारी फिरलो. उजव्या बाजूला मदन गडाकडाचा दिशेने चालत आलो. पुढे हि वाट एका घळीमधून खाली आलेली वाटे मध्ये एका ठिकाणी कातळा मधील पायऱ्या होत्या या वरून हि पूर्वी पासूनची वाट असावी असे वाटले. खाली पठारावरून मागे वळून पाहता आपण किती मोठा ट्रेक केला याची प्रचिती आली. दुपारी ०४:०० वाजता आम्ही आंबेवाडी येथे येऊन पोहचलो लक्ष्मणचा घरी जेवणावरती ताव दिला मुंबई - पुणे कडे निघालो. आम्ही रात्री ११:०० वाजता पुणेला पोहचलो. माझ्या मनात जसा AMK होता त्या पेक्षा मला तो जास्त भावला. या ट्रेकने माझी आणखीन एक इच्छा पूर्ण झाली. हा खूप सुंदर ट्रेक आहे त्या मुळे सर्व सह्यांद्री भटक्यांनी आयुष्यात एकदा तरी या ट्रेकचा अनुभव घ्यावाच असे वाटते.


कुलंग गडावरून आंबेवाडीकडे जाताना वाटे मध्ये असलेल्या पायऱ्या
कुलंग गडावरून आंबेवाडीकडे जाताना वाटे मध्ये असलेल्या पायऱ्या

पठारावरून दिसणारे अलंगगड, मदनगड व कुलंगगड
पठारावरून दिसणारे अलंगगड, मदनगड व कुलंगगड 

हे तिन्ही किल्ले फिरताना एकमेकाला जोडलेले असल्याकारणाने मदनगडावरून दिसणारा अलंगगड, कुलंगगड छोटा कुलंगगड. तर अलंग गडावरून दिसणारा मदनगड त्यामागे मागे कुलंगगड छोटा कुलंगगड. कुलंग गडावरून दिसणारा मदनगड अलंगगड छोटा कुलंगगड हे सर्व एक किंवा दोन दिवसाच्या ट्रेक मध्ये पाहणे म्हणजेच सह्याद्री भटक्यांसाठी सुख आहे.

#आंबेवाडी या गावातील वाटाड्या लक्ष्मण केकरे +919021652693

सोबती: प्रदीप मदने, शैलेश जाधव ट्रेकगुरु टीम सोबत आलेले इतर सदस्य

@सुशील राजगोळकर

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.